नवी दिल्ली
ईशान्य दिल्लीतील हिंसाचारानंतर आता तेथील परिस्थितीत सुधारणा होत आहे. ईशान्य दिल्लीतील हिंसाचार आता कमी झाला असल्याचे दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी स्पष्ट केले आहे. या हिंसाचारामुळे सर्वांचेच नुकसान झाल्याचे सांगत केजरीवाल यांनी या हिंसाचारात बळी गेलेल्यांच्या कुटुंबाला 10-10 लाख रुपयांची नुकसानभरपाई देण्याची मोठी घोषणा केली. या बरोबरच हिंसाचारात गंभीर जखमी झालेल्यांना 2-2 लाख रुपयांची नुकसान भरपाई देण्याची घोषणाही मुख्यमंत्री केजरीवाल यांनी केली आहे. ज्यांचे घर जळले असेल, अशांनाही 5 लाख रुपयांची नुकसान भरपाई देण्यात येणार आहे. तर, ज्यांची दुकाने जाळण्यात आली, अशांनाही दुकानदारांना प्रत्येकी 5 लाख रुपयांची नुकसान भरपाई देण्यात येणार आहे.
दिल्ली हिंसाचारासंदर्भात पत्रकार परिषदे आयोजित करत दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी गुरुवारी या मोठ्या घोषणा केल्या. या हिंसाचारात जखमी झालेल्या कुणीही खासगी रुग्णालयात उपचार घेतल्यास त्याचा सर्व खर्च सरकार करेल, अशी घोषणाही केजरीवाल यांनी केली आहे. ङ्गफरिश्तेफ योजनेअंतर्गत या हिंसाचारात जखमी झालेल्या लोकांवर उपचार करण्यात येतील, असेही केजरीवाल म्हणाले.